
अमरावती : महाराष्ट्रातून रोजगाराच्या शोधात मध्य प्रदेशच्या सीमेवरील देडतलाई या गावात गेलेल्या एका आदिवासी महिलेने आर्थिक अडचणीमुळे आपल्या अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याची केवळ दहा हजार रुपयांत विक्री करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या व्यवहाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खकनार पोलिसांनी दोन संशयितांविरुद्ध मानव तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे.