esakal | संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

राज्यातील शेतकरी दुष्काळासोबतच अतिवृष्टी व महापुराने हैराण आहेत. अनेक वर्षांपासून नापिकीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे नाशिकला धरणे आंदोलन करण्यात आले. 

संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक - राज्यातील शेतकरी दुष्काळासोबतच अतिवृष्टी व महापुराने हैराण आहेत. अनेक वर्षांपासून नापिकीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे नाशिकला धरणे आंदोलन करण्यात आले. 

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, देवीदास पवार, शंकर पूरकर, संतू पाटील झांबरे, भगवान बोराडे, त्र्यंबक गांगुर्डे आदींच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. दुष्काळ, महापुराने हैराण असल्याने घरखर्च चालविणेही अवघड झालेल्या शेतकऱ्यांना कर्जफेड अवघड झाली आहे. पिकणाऱ्या पिकाला भाव नाही. दुसरीकडे बॅंकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसुली सुरू आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही. शेतीमाल नियमनमुक्त करण्याच्या घोषणा हवेत विरल्या आहेत. प्रत्यक्ष त्यावर कार्यवाही होत नाही. अशा विविध अडचणींनी हैराण शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा रद्द करून बाजारपेठेचे स्वातंत्र्य दिले जावे, आदी मागण्यांसाठी धरणे धरण्यात आले. 

loading image
go to top