
छत्रपतींच्या अवमानाविरुद्ध बोलणाऱ्या खासदार कोल्हेंचा माईक केला बंद; मनसेने म्हटलं...
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच काही भाजपा नेते गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. यावरुन विरोधकांकडून तीव्र टीका केली जात आहे. हाच मुद्दा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत उपस्थित केला.
मात्र त्यावेळी त्यांचा माईक बंद केल्याचं समोर आलं होतं. त्यावर मनसे नेते मनोज चव्हान यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले की, "दिल्लीमध्ये काल लोकसभेत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर होत असलेल्या वादग्रस्त विधानावर आवाज उठवला मात्र त्यांच्या माईक बंद करण्यात आला हे होवून ही महाराष्ट्रतील ४८ खासदारांपैकी एकही खासदार कोल्हे यांच्या मदतीला आला नाही"
हेही वाचा: Bhagat Singh Koshyari: राज्यपाल कोश्यारी यांचं पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य, म्हणाले..."
हेही वाचा- Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
"किंवा विरोध केला नाही. वास्तविक पाहता महाराजांबद्दल सभागृहात चर्चा देखील होवून दिली नाही त्यावेळी सर्व खासदारांनी सभा त्याग केला पाहिजे होता मात्र ते झालं नाही. अशा खासदारांचा मी धिक्कार करतो, महाराष्ट्रातील जनता चुकीच्या माणसाला निवडून देते. आम्ही संसदेचा निषेध करतोच आणि या खासदारांनी आवाज उठवला नाही म्हणून त्यांची ही आम्ही निषेध करतो." असं मत मनसेचे नेते मनोज चव्हान यांनी व्यक्त केले.