खासदार कृपाल तुमानेंचा नवनीत राणांवर हल्ला; मंत्री व्हायचे म्हणून... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Kripal Tumanes attack on Navneet Rana

खासदार कृपाल तुमानेंचा नवनीत राणांवर हल्ला; मंत्री व्हायचे म्हणून...

नवनीत राणा (Navneet Rana) यांचे जातप्रमाणपत्र बोगस असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे. यामुळे त्यांची खासदारकी जाऊ शकते. यामुळे भाजपशी त्यांनी जवळीक वाढवल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने (Kripal Tumane) यांनी केला. (MP Kripal Tumanes attack on Navneet Rana)

राणा दाम्पत्याने अमरावतीमध्ये मोठा भूखंड हडपला आहे. ते बिल्डरशी हातमिळवणी करून टोलेजंग इमारत बांधत आहे. एका व्यक्तीची संस्था हडपून ताबा मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याची कागदपत्रे आपल्याकडे आहेत. भाजपला (BJP) खूश करून खासदार नवनीत राणा यांना मंत्री व्हायचे आहे. सोबतच बनावट जात प्रमाणपत्राचा निकाल आपल्या बाजूने लावायचा आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या विरोधात राणा दाम्पत्याचा खटाटोप सुरू असल्याचा आरोपही कृपाल तुमाने (Kripal Tumane) यांनी केला.

हेही वाचा: Nagpur Crime : गुंडाचा खून ते पत्रकाराच्या आई व मुलीची हत्या

राखीव मतदारसंघातून निवडून आल्यानंतर नवनीत राणा यांनी दलित-आदिवासींसाठी काहीच केले नाही. डॉ. पल्लवी तडवी हिने उच्चवर्णीयांनी छळ केल्यावर आत्महत्या केली. भाजपच्या कार्यकर्त्याने दिनेश वाघमारे याची हत्या केली. औरंगाबादमध्ये तरुणाला मंदिरात प्रवेश केल्याने मारहाण झाली. या घटनांवर नवनीत राणा (Navneet Rana) काहीच न बोलल्याने त्यांना स्वत:ला दलित म्हणून घेण्याचा अधिकार नाही, असे सुरेश साखरे म्हणाले.

Web Title: Mp Kripal Tumanes Attack On Navneet Rana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top