esakal | 'महाराष्ट्रात लवकरच सत्ताबदल; राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार'
sakal

बोलून बातमी शोधा

MP Ranjitsingh Naik-Nimbalkar

अल्पावधीतील माझ्या कामामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी माझे नाव पुढे केले होते, असे खासदार रणजितसिंह यांनी सांगितले.

'महाराष्ट्रात लवकरच सत्ताबदल; राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार'

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (सातारा) : माढा मतदारसंघात (Madha Constituency) निवडून आल्यापासून पाणीप्रश्नावर माझे लक्ष केंद्रित केले आहे. सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. केलेल्या कामांमुळे माझे नाव मंत्रीपदापर्यंत गेले, त्याचा मला व जनतेला अभिमान आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसले तरी संपूर्ण मोदी सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. लवकरच राज्यात भाजपचे सरकार (BJP Government) स्थापन होईल, असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (MP Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांनी व्यक्त केला. (MP Ranjitsingh Naik-Nimbalkar Testified That BJP Government Will Come Again In Maharashtra bam92)

झिरपवाडी (ता. फलटण) येथील कार्यक्रमात खासदार निंबाळकर बोलत होते. ते म्हणाले, ‘मी पहिल्यांदाच खासदार झालो व अगदी कमी कालावधीत माझी मंत्रिपदाची शिफारस राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री नारायण राणे ज्येष्ठ असल्याने त्यांना मंत्रीपद मिळाले. अल्पावधीतील माझ्या कामामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी माझे नाव पुढे केले होते. मला मंत्रिपद मिळाले नाही, म्हणून मी स्वतः ही नाराज नाही. कार्यकर्त्यांनीही होऊ नका.

हेही वाचा: 'राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदासाठी वेळ मागितली, पण..'

अल्पावधीतच माझ्या नावाची चर्चा केंद्रीय मंत्रिपदासाठी झाली. याचा मला अभिमान वाटतो. मंत्रिपद मिळाले नाही तरी आपल्या माढा मतदारसंघात सिंचनाचे अनेक प्रश्न रखडलेले आहेत. ते पूर्ण करण्यासाठी मला तुमची व केंद्रातील वरिष्ठ मंडळींची मदतीची गरज आहे. यामुळे मंत्रीपदापेक्षा माझ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्याला पाणी उपलब्ध करून देणे माझे ध्येय आहे.’’ गेली अनेक दिवस राज्यात सत्ताबदल होईल, याची फक्त चर्चा होती. मात्र, आता ही चर्चा न राहता लवकरच सत्यात उतरेल. भाजपचा मुख्यमंत्री दिसेल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: ठरलं! ZP साठी काँग्रेसचा 'टाॅप प्लॅन'

हक्काचे पाणी मिळवणार

खासदार निंबाळकर म्हणाले,‘‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात विकासाचा डोंगर उभा राहत आहे. यामध्ये माढा मतदारसंघात विकासासाठी लागेल एवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. येत्या काळात आपल्या हक्काचे पाणी मिळवून आपला मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यात येईल.

MP Ranjitsingh Naik-Nimbalkar Testified That BJP Government Will Come Again In Maharashtra bam92

loading image