esakal | वादळा पुर्वीची शांतता! मराठा समाज आक्रमक होण्याच्या मार्गावर!
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji raje chhatrapati letter to CM uddhav thackeray for lockdown in kolahpur

वादळा पुर्वीची शांतता! मराठा समाज आक्रमक होण्याच्या मार्गावर!

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू स्मारक (Rajarshi Chhatrapati Shahu Memorial)समाधी परिसरात येत्या १६ जूनला मूक आंदोलन (Silent movement)आहे. मंत्री, खासदार व आमदारांनी मराठा आरक्षणासाठी नक्की काय करणार, याची ठोस भूमिका त्या वेळी जाहीर करावी, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांनी केले आहे. त्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत आंदोलन आहे. आंदोलनाच्या परिसरात कोल्हापूर व राज्यातील समन्वयक आणि दोन हजार १८५ विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमोर लोकप्रतिनिधींनी सन्मानपूर्वक येऊन भूमिका मांडावी, असेही त्यांनी सांगितले. (mp-sambhaji-raje-chhatrapati-appeal-to-the-people-representatives-maratha-reservation-marathi-news)

वादळा पुर्वीची ही शांतता. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा ! कारण ही वादळापूर्वीची शांतता आहे,'' अशी टॅगलाईन संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. मराठा समाज कुणाही जाती, धर्माच्या किंवा राजकीय पक्षाविरोधात नाही, तर तो स्वतःच्या हक्काची लढाई लढत आहे. येत्या १२ जूनला दुपारी कोपर्डी येथे भेट देणार आहे. पुणे येथून सर्व समन्वयक तेथे येतील. तेथून पुढे काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतिस्थळास भेट देणार असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत!

या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही, तर आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत. ''पुणे ते मुंबई मंत्रालय,'' असा महामोर्चा काढण्यात येईल. या मोर्चात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मराठा समाजाने सहभागी होऊन ताकद दाखवावी. हा जोर एकदाच असा लावू, की सरकारचे डोळे उघडतील, असे संभाजीराजे यांनी ठणकावून सांगितले.