
राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळाव्यातून खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांच कौतुक केलं
छगन भुजबळच ओबीसींना न्याय देऊ शकतात, सुप्रिया सुळेंकडून कौतुक
ओबीसी आरक्षणावरून केंद्र सरकार आणि भाजप जनतेची दिशाभूल करत आहे. छगन भुजबळच ओबीसींना योग्य तो न्याय देऊ शकतात, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. आज राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळाव्यातून खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांच कौतुक केलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.
हेही वाचा: 'न्यायालय काही सांगो, OBC आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात निवडणूक नको'
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, छगन भुजबळ यांनी सुरवातीपासून ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्षणीय काम केलं आहे. त्यामुळे तेच ओबीसींना योग्य तो न्याय देऊ शकतात. कोविडच्या काळात भुजबळ यांनी कोणात्याही व्यक्तीला अन्न कमी पडू दिलं नाही, हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे.
राजकीय लोकांना श्राप देण हे हास्यास्पद आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथे महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी अधिकार दिला आहे. त्यामुळे श्राप याबद्दल अंधश्रद्धा नसावी. फुलेंबाबत बोलताना महाराष्ट्रातील नेते श्राप श्राप बोलतात. या सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला आहे. त्यामुळे असे बोलणाऱ्यांविरोधात केस दाखल झाली पाहिजे. राज्याचे माजी मुख्यमंत्रीच असं बोलून मूळ विषयाला बगल देत असतील तर मग महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारला काळीमा फासण्याचं काम ते करत आहेत, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
हेही वाचा: 'बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? ब्रह्मदेवाला चुकवून...' सदाभाऊंचा खोचक टोला
Web Title: Mp Supriya Sule Appreciate To Chhagan Bhujbal Obc Reservation Community Rights Justice Give
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..