राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे मी तासात खोडून काढू शकते : सुप्रिया सुळे

Supriya Sule vs Raj Thackeray
Supriya Sule vs Raj Thackerayesakal
Summary

'यायचं, भाषण करायचं आणि निघून जायचं ही आमची पध्दत नाही.'

कऱ्हाड (सातारा) : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) साहेब १९७२ सालापासून सोलापूरच्या सिध्देश्वर मंदिरात (Siddheshwar Temple Solapur) जातात, हे तेथील अध्यक्षांनी मला दर्शनसाठी गेल्यावर सांगितलं. मी डेटाबेस बोलते, थिल्लर बोलत नाहीय. राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे मी एक तासात खोडून काढू शकते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणावर आज येथे लगावला.

कऱ्हाड दौऱ्यावर असताना ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या समाधीस्थळी खासदार सुळे यांनी आज अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), सारंग पाटील, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संगीता साळुंखे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी नगरसेवक सौरभ पाटील, नंदकुमार बटाणे, जयंत बेडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. खासदार सुळे पुढं म्हणाल्या, काही लोकं खूप भाषण करतात आणि पवार साहेबांवर टिका-टिप्पणी करतात. भाषणामध्ये राज ठाकरे यांनी पवार साहेब नास्तिक आहेत, कधीही कोणीही त्यांना मंदिरात जाताना बघितलेलं नाही, असं सांगितलं. अलिकडं नवीन नेते भाषण करताना भान ठेवत नाहीत. मी सोलापूरला गेल्यावर तेथील सिध्देश्वर मंदिरात गेले. तेथील अध्यक्षांनी माझा सत्कार करुन ताई तुम्ही दुसऱ्यांदाच मंदिरात आला आहात. अजित दादाही एक-दोन वेळाच आले आहेत.

Supriya Sule vs Raj Thackeray
..तर मुस्लिमांना कोणीही रोखू शकणार नाही; काँग्रेस नेत्याचं चिथावणीखोर वक्तव्य

मात्र, साहेब १९७२ साली पालकमंत्री असल्यापासून खूपवेळा मंदिरात येवून गेले आहेत. १९९३ साली साहेब मंदिरात आल्यावर आमच्या मागणीवरुन पाण्यासाठी त्यांनी २५ लाख रुपये दिले होते. त्यामुळं आता पवार साहेब मंदिरात जातात की, नाही हे डेटावरुन समोर आलंय. मी राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे एक तासात खोडून काढू शकते. यायचं, भाषण करायचं आणि निघून जायचं ही आमची पध्दत नाही, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com