
खासदार उदयनराजे यांनी गृहनिर्माणमधून अर्ज दाखल केला होता.
SDCCB : सातारा बँक निवडणुकीत दोन्ही राजे बिनविरोध
सातारा : जिल्हा बँकेसाठी (Satara Bank Election 2021) खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) आणि सातारा तालुका विकास सेवा सोसायटीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांची बिनविरोध निवड झाली आहे. खासदार उदयनराजे यांनी गृहनिर्माणमधून अर्ज दाखल केला होता.
त्यांच्याविरोधात सभापती रामराजे समर्थक ज्ञानदेव पवार, दिलीप सिंह भोसले, उदयसिंह बरदाडे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्ज माघार घेण्याचा शेवटच्या दिवशी यांच्यासह अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने उदयनराजेंची बिनविरोध निवड झाली.
हेही वाचा: त्रिपुरात भाजपचा झेंडा; निवडणुकीत 334 पैकी 112 जागांवर विजय
तर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात विनय कडव आणि पांडुरंग देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांनीही अर्ज काढून घेतल्याने शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही बिनविरोध निवडून आले आहेत.
हेही वाचा: सरकार पडत नाही म्हणून भाजपनं आमचा नाद सोडून दिलाय : पृथ्वीराज चव्हाण
Web Title: Mp Udayanraje Bhosale And Mla Shivendrasinghraje Bhosale Were Elected Unopposed In Bank Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..