मला कोणाला मोठं करणं पसंत नाही : उदयनराजे

रयतचा पदसिद्ध अध्‍यक्ष मुख्‍यमंत्री हवा
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Summary

रयत शिक्षण संस्‍थेस साताऱ्याच्‍या राजघराण्‍याने मदत केली आहे.

सातारा : रयत शिक्षण संस्‍थेस त्या वेळी राजमाता सुमित्राराजे भोसले (Rajmata Sumitraraje Bhosle) व राजघराण्‍यातील इतर व्यक्तींनी वेळोवेळी मदत केली आहे. अलीकडे रयतचा अर्थ बदलत चालला असून, याठिकाणी होणाऱ्या मर्जीनुसारच्‍या नेमणुका धोकादायक आहेत. रयत एका कुटुंबाभोवती केंद्रित होत चालली आहे. रयतचा पदसिद्ध अध्‍यक्ष हा राज्‍याचा मुख्‍यमंत्री असावा, असे घटनेत कर्मवीरांनी नमूद केले होते. त्‍यानुसार सध्‍याचे मुख्‍यमंत्रीच रयतचे अध्‍यक्ष असणे आवश्‍‍यक असल्‍याचे सांगत आज खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्‍यावर टीका केली.

Udayanraje Bhosale
ठरलं! शिवेंद्रसिंहराजेंना घेऊनच NCP चे पॅनेल

उदयनराजे म्‍हणाले, ‘‘रयत शिक्षण संस्‍थेस (Rayat Shikshan Sanstha) साताऱ्याच्‍या राजघराण्‍याने मदत केली आहे. मदत केली असली तरी आमच्‍या कुटुंबातील कोणालाही त्‍यात स्‍थान देण्‍यात आले नाही. मलाच संस्‍थेत घ्‍या, असे माझे मत नाही, मात्र कुणालातरी स्‍थान द्या. हवे तर मतदानाचा अधिकार नाकारा. निमंत्रित सदस्‍य घ्‍या, असे म्‍हणालो तर म्‍हणतात बोर्डाची मान्‍यता घ्‍यावी लागेल. मला अनेक जण भेटतात. म्‍हणतात, की आम्‍ही संस्‍थेसाठी झिजलो; पण आम्‍हाला स्‍थान देण्‍यात येत नाही. मी काही बोललो तर म्‍हणतात, कुठे अर्ज आला होता. काय उत्तर येणार हे मला माहीत असते, त्‍यामुळे मला त्‍याचे वाईट वाटत नाही. राजघराण्‍याची कृतज्ञता म्‍हणून तरी कोणालातरी स्‍थान द्या, मात्र ते होत नसल्‍याची खंत मला वाटते.’’

Udayanraje Bhosale
उदयनराजे स्वबळावर निवडणूक लढवणार?

ते म्हणाले, ‘‘राजघराणे व्‍यक्‍ती केंद्रित नाही. त्या वेळी आमच्‍या पूर्वजांनी मनात आणले असते, तर ही संस्‍था आमच्‍या ताब्‍यात असती, मात्र तसा विचार छत्रपतींच्‍या घराण्‍यात नाही. छत्रपतींच्‍या रयत हिताचाच विचार आम्‍ही पुढे नेत आहोत. अलीकडच्‍या काळात रयतचा अर्थ बदलत चालला असून, संपूर्ण कामकाज कुटुंब केंद्रित सुरू आहे. संस्‍थेचे खासगीकरण सुरू आहे. वडाच्‍या झाडाला वाळवी लागायला सुरुवात झालीय. वड वाळणार, वठणार. वडाच्‍या झाडाखाली खासगीकरण झाले तर गोरगरिबांची मुले जाणार कुठे? एखादी कंपनी येईल. डोनेशन, कॅपिटेशन, ॲडमिशनचा खेळ सुरू होईल आणि त्‍यात कर्मवीर आण्‍णांचा विचार नाहीसा होईल. संस्‍था जनतेचीच राहिली पाहिजे.’’ कर्मवीर अण्‍णांनी रयतची घटना केली असून, राजकारण टाळण्‍यासाठी त्‍यांनी पदसिद्ध अध्‍यक्ष राज्‍याचा मुख्‍यमंत्री असावा, असे म्‍हटले होते. माझेही तेच मत आहे. कोणत्‍याही पक्षाचा मुख्‍यमंत्री असो, तो रयतचा अध्‍यक्ष असावा. मला कोणाचे नाव घेऊन बोलायचे नाही. कारण त्‍यांना मोठे करणे मला पसंत नाही, असे म्‍हणत उदयनराजेंनी नाव न घेता खासदार शरद पवार यांच्‍यासह अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्‍यावर निशाणा साधला.

Udayanraje Bhosale
वाट्टोळं करणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे; उदयनराजेंचा अजित पवारांवर संताप

रयतला फुली आणि कुटुंबाला महत्त्‍व

रयतचे कामकाज पवार कुटुंबाभोवती केंद्रित होत असल्‍याचे नाव न घेता सांगत असतानाच त्‍यांनी रयतला फुली मारत एका कुटुंबाचे महत्त्‍व वाढविण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे. कुटुंबाला येत चाललेले महत्त्‍व संस्‍थेसाठी धोक्‍याचे आहे. वेळ आलीय. जनतेने यावर बोलणे आवश्‍‍यक आहे. संस्‍थेतील कामकाजावर कर्मवीर अण्‍णांच्‍या वारसांनी मत मांडले पाहिजे. त्‍यांचे मत काय हे त्‍यांनाच विचारा, असेही एका प्रश्‍‍नावर उत्तर देताना ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com