MarathaReservation : तर मी राजीनामा देईन : उदयनराजे

सिद्धार्थ लाटकर
Friday, 18 September 2020

मी एक सांगताे माझा मूलगा जे खाताे, माझी मूलगी जे खातात ते प्रत्येकाला मिळाले पाहिजे. आघाडी बिघाडी तिघाडी यांनी ते करुन दाखवावा असेही उदयनराजेंनी स्पष्ट केले.

सातारा : मराठा समाजावर नव्हे तर कोणावरही अन्याय हाेत असेल तर मी राजीनामा देईन. कोण चुकले कोण नाही या तपशिलात मला जायचे नाही. मला कोणत्याही पक्षाचे लेबले लावू नका. मी कधीच कूठल्या गाेष्टीचे राजकारण करत नाही असे परखड मत खासदार उदयनराजे भाेसले यांनी व्यक्त केले. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलखातीत उदयनराजे बाेलत हाेते. उदयनराजे म्हणाले पहिल्या चार जाती होती. ब्राम्हण, क्षत्रिय, वैष्णव, क्षुद्र याच ना. त्यानंतर पोट जाती निर्माण झाल्या. जात म्हणजे जाता जात नाही ती जात. लहानपणी गोट्या खेळताना, विटी दांडू खेळताना तुम्ही काेणाची जात बघितली होती का. मग आत्ताच का असा प्रतिप्रश्न उदयनराजेंनी केला. 

आरक्षणावरुन सध्या श्रेयवाद सुरु आहे, यावर उदयनराजे म्हणाले श्रेयवाद कोणी घेऊ नये आणि करु पण नये. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका ठेवावी. न्याय मिळत नसेल तर उद्रेक होणारच. आत्ता श्रेयवाद कोण घेत आहे याच्याशी मला देणे घेणे नाही. आघाडी सरकारने हा प्रश्‍न नीट हाताळला आहे का यावर उदयनराजे म्हणाले माझे डोके तर बधिर झाले आहे. मी एक सांगताे माझा मूलगा जे खाताे, माझी मूलगी जे खातात ते प्रत्येकाला मिळाले पाहिजे.

महाविकास आघाडीच्या सरकारकडून हे न झाल्यास तुम्ही काय करणार यावर उदयनराजे म्हणाले मी कधीच काेणत्या गाेष्टीत राजकारण करीत नाही. आघाडी बिघाडी तिघाडी यांनी ते करुन दाखवावा. आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार. तुम्हांला सांगताे मी मनापासून बोलतो, मी कधी राजकारण केलं.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच. फक्त मराठा समाजासाठीच नाही इतर कोणावर अन्याय होत असतील तर त्यांच्यासाठीही लढणार. कोणावर अन्याय झाला आणि वेळ आली तर राजीनामा देणार. काय होत नसेल तर पदावर राहून काय उपयोग?" असा सवाल उदयनराजेंनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Udayanraje Bhosale Interview Maratha Reservation Satara News