राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लवकरच सातारा दौऱ्यावर; ऐतिहासिक नगरीला भेट देणार

'द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदावर निवड करून भारतानं नवीन इतिहास रचला.'
Draupadi Murmu Udayanraje Bhosale
Draupadi Murmu Udayanraje Bhosaleesakal
Summary

'द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदावर निवड करून भारतानं नवीन इतिहास रचला.'

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपतिपदी भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (64) यांची प्रचंड मताधिक्यांनी निवड झाली. या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला आणि भारताच्या दुसऱ्या महिला आहेत. मुर्मू यांची या पदावर निवड करून भारतानं नवीन इतिहास रचलाय, असं प्रतिपादन साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलंय.

दरम्यान, भारताच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच भेट घेतलीय. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांच्या शिक्षणाला प्राधान्य देवून महिलांचा सन्मान करणारे छत्रपती प्रतापसिंह महाराज (Chhatrapati Pratapsingh Maharaj) यांच्या ऐतिहासिक सातारानगरीला (Satara Nagari) मी आवश्य भेट देईन, असं आश्वासन राष्ट्रपती मुर्मू यांनी उदयनराजेंना दिलंय. भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपतीपदी मुर्मू यांची निवड झाली. त्यानिमित्त राष्ट्रपतींची भेट घेऊन उदयनराजेंनी त्यांचं अभिनंदनही केलंय.

Draupadi Murmu Udayanraje Bhosale
शिंदेंच्या बंडखोरीमागं भाजपच; उद्धव ठाकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट

उदयनराजेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, भारताच्या राष्ट्रपतीपदी प्रथमच आदिवासी महिला म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली. भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार मुर्मू यांची प्रचंड मताधिक्यांनी निवड झालीय. या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला आणि भारताच्या दुसऱ्या महिला आहेत. मुर्मू यांची या पदावर निवड करून भारतानं नवीन इतिहास रचला, असं त्यांनी म्हटलंय. या भेटीत उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे एक प्रतिक राजमुद्रा आणि पुष्पगुच्छ भेट देवून राष्ट्रपतींचा सन्मान केला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना साताऱ्याचा ऐतिहासिक, तसेच सामाजिक वारसा सांगितला.

Draupadi Murmu Udayanraje Bhosale
मी राजकारणात येण्यास उत्सुक होतो, पण नियतीनं मला..; सरन्यायाधीशांचं मोठं विधान

छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेल्या सातारा नगरीत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी सामाजिक परिवर्तनासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. त्यांनी आपल्या रयतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. विशेषतः महिलांच्या शिक्षणाची सोय साताऱ्यात निर्माण केली. अशा या ऐतिहासिक सातारा नगरीला आपण आवश्य भेट द्यावी, अशी विनंती उदयनराजेंनी राष्ट्रपतींना केली. राष्ट्रपती मुर्मू यांनी काही काळ शिक्षिका म्हणून नोकरी केलीय. त्यामुळं त्यांना शिक्षणाचं महत्व चांगलंच माहीत आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचं महत्व त्यांना अधिक माहीत आहे. त्यामुळं ज्या सातारच्या छत्रपती घराण्यानं महिलांच्या शिक्षणाचा वारसा निर्माण केला, अशा मराठा साम्राजाच्या राजधानीस मी आवश्य भेट देईन, तसंच सातारा नगरीचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सहकार्य देवू, असं आश्वासनही राष्ट्रपतींनी उदयनराजेंना दिलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com