
उपजिल्हाधिकारी असल्याचं भासवून सत्कार स्वीकरणाऱ्या मुलीला mpsc ने केले debar
उप जिल्हाधिकारी पदावर निवड झाली नसताना निवड झाल्याचे भासवून सत्कार स्वीकारल्याचे कारणास्तव कुमारी वैष्णवी अर्जुन गिरी यांना आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीसाठी कायमस्वरुपी प्रतिरोधित (Debar) करण्यात आले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
नगर जिल्ह्यातील वैष्णवी अर्जुन गिरी या तरुणीने उपजिल्हाधिकारी झाल्याचे खोटे पत्र तयार करून सत्कार सोहळे करून घेतले. या तरुणीने उपजिल्हाधिकारी झाल्याचे सांगत एमपीएससीच्या सही आणि शिक्क्याचे खोटे पत्र तयार केले. या पत्रात तिची निवड स्पोर्ट कोट्यातून झाल्याचा उल्लेखही आहे.
या घटनेनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एमपीएसीने ही माहिती ट्वीट करत दिली आहे.
वैष्णवी अर्जुन गिरी या तरुणीसह भोकरदन तालुक्यातील कोदोली येथील रामेश्वर पंढरीनाथ लोखंडे यानेही असाच प्रकार केला होता. एमपीएससी परीक्षेतून मुंबई राज्य विक्रीकर उपायुक्त पदी निवड झाल्याचे सांगितले. याबदल त्याचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कारही करण्यात आला. या तरुणावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
Web Title: Mpsc Debarred The Girl Who Becoming An Officer Through Fake Letter Fraud
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..