MPSC Exam : राज्यसेवा परीक्षा निकालात गोंधळ! जास्त गुण असूनही विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान नाही

गुण चांगले मिळतील आणि यंदा गुणवत्ता यादीमध्ये नक्की नाव असेल. मात्र जेव्हा यादी पाहिली तेव्हा पायाखालची जमीनच सरकली.
MPSC Exam
MPSC Examsakal
Updated on

- प्रज्वल रामटेके

पुणे - रात्री सगळे गाढ झोपले होते, पण एका खोलीत अजूनही उजेड होता. डोळे थकलेले, पण मन सतत म्हणत होतं...‘थोडं अजून वाच... उद्या तू अधिकारी होणार आहेस’, अशाच अनेक रात्री जागून अभ्यास करून राज्यसेवेची परीक्षा दिली. परीक्षा झाल्यावर आत्मविश्वास होता की, लिहिलेली उत्तरे बरोबर आहेत.

गुण चांगले मिळतील आणि यंदा गुणवत्ता यादीमध्ये नक्की नाव असेल. मात्र जेव्हा यादी पाहिली तेव्हा पायाखालची जमीनच सरकली. कटऑफपेक्षा जास्त गुण असूनदेखील यादीमध्ये नाव नाही. हा फक्त धक्का नव्हता, तर अनेक वर्षांपासून करत असलेली मेहनत, पाहिलेल्या स्वप्नांचा अंत होता, अशी भावना स्पर्धा परीक्षेच्या एका उमेदवाराने व्यक्त केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) होणारी राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा (राज्यसेवा) १ डिसेंबर २०२४ रोजी पार पडली. या परीक्षेचा निकाल १२ मार्च रोजी जाहीर करण्यात आला. या वेळी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.

या यादीमध्ये कटऑफपेक्षा जास्त गुण असूनदेखील अनेक विद्यार्थ्यांची नावे या यादीमध्ये नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र असूनदेखील आयोगाच्या या हलगर्जीपणामुळे अन्याय होत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, ‘ऑप्टिकल मार्क रिकग्निशन (ओएमआर) शीट तपासून पाहिली. तेव्हा कटऑफपेक्षा जास्त गुण असल्याचे स्पष्ट झाले. मात्र निकाल पाहिल्यानंतर गुणवत्ता यादीमध्ये नाव नाही आले.

त्यामुळे आयोगाच्या तांत्रिक चुकीमुळे आयुष्य पणाला लागले आहे. त्यामुळे आयोगाने निकाल सुधारित करून आम्हाला या गुणवत्ता यादीत नाव समाविष्ट करावे.’’ यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

‘मॅट’च्या निकालाकडे लक्ष

आयोगाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरनामध्ये (मॅट) धाव घेतली आहे. मात्र ‘मॅट’ने या प्रकरणावर २४ एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर २६, २७, २८ एप्रिल रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा असून दोन दिवसांत अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

प्रकरण समजून घेण्यासाठी...

एक स्पर्धा परीक्षा उमेदवार ‘इतर मागास’ प्रवर्गातील (ओबीसी) आहे. त्याला २०० पैकी ११८.५० गुण आहेत. ओबीसी प्रवर्गाचा कटऑफ मुलांसाठी ११७.५० इतका आहे. एक गुण जास्त असूनदेखील या विद्यार्थ्याचे नाव गुणवत्ता यादीमध्ये नाही.

मी एसईबीसी प्रवर्गातील महिला उमेदवार आहे. या प्रवर्गाचा कटऑफ ११०.५० इतका आहे. मला ११२.५० इतके गुण आहेत. मात्र, तरीदेखील पूर्व परीक्षेच्या निकालामध्ये माझे नाव नाही. या संदर्भात आयोगाकडे विचारणा केली असता कोणतेही स्पष्टीकरण मिळाले नाही. आयोगाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे आयोगाने तत्काळ निकाल सुधारित करून आम्हाला आमची संधी मिळवून द्यावी.

- एक उमेदवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com