MPSC Exam : स्थापत्य अभियांत्रिकीच्या मुख्य परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर

पसंतीक्रम सादर करणे व भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी वेबलींक सुरू
mpsc exam
mpsc examsakal

मुंबई : महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 ची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी (Merit List) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पसंतीक्रम सादर करणे तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी वेबलिंकही सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली. (MPSC Exam General merit List of Civil Engineering Main Examination Announced aau85 )

प्रसिद्धी पत्रकानुसार, ही सर्वसाधारण गुणवत्तायादी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगानं अंतिम निकालापूर्वी कागदपत्रांच्या पुनर्पडताळणी करताना काही बदल होऊ शकतात या हेतूनं ही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. मुलाखतीपूर्वी उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागवण्यात आले होते. पण आयोगानं सुधारित कार्यपद्धतीचा स्विकार केल्यानं सर्व उमेदवारांना पुन्हा पसंतीक्रम नव्याने सादर करणं बंधनकारक असणार आहे.

आयोगाच्या वेबसाईटवरुन प्रक्रिया पार पाडता येईल

संवर्ग किंवा पदांचे पसंतीक्रम किंवा भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय सादर करण्यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या वेबसाईटवर Online Facilities या मेनूमध्ये Post Preference/Opting Out ही वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही वेबलिंक १२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजल्यापासून २० फेब्रुवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तसेच या प्रक्रियेत जर काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००१२३४२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच support-online@mpsc.gov.in या ईमेलवर संपर्क साधता येईल.

अंतिम निकालाबाबत पुढीलप्रमाणं कार्यवाही होईल...

१) पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या पदासाठी पसंतीक्रम देतील केवळ त्याच संवर्ग किंवा पदावरील निवडीसाठी त्यांचा विचार करण्यात येईल.

२) कालावधी उलटून गेल्यानंतर यासंदर्भातील कोणत्याही विनंतीची दखल घेतली जाणार नाही.

३) भरती प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या उमेदवारांचा अंतिम शिफारशींसाठी विचार होणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com