MPSC Exam: 40 लाख रुपये द्या, प्रश्नपत्रिका घ्या! 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांना फोन; Audio Clip Viral

MPSC Exam: फक्त आपले ओरिजनल कागदपत्रे जमा करावे लागतील. त्यानंतर मुख्य परीक्षेलादेखील प्रश्नपत्रिका दिली जाईल. असे एका पुरुषाच्या आवाजातील संभाषण रेकॉर्ड झालेलं आहे. यात संबंधीत विद्यार्थी तुम्ही माझे मित्र तर नाही ना, की उगाच मस्करी करत आहात, अशीही विचारणा करत आहे.
MPSC
MPSCesakal
Updated on

मुंबईः एमपीएससी पूर्व परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देतो, ४० लाख रुपये द्या, असं म्हणत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आमिष दाखवण्याचे प्रकार पुण्यात घडले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यापूर्वीच आमिष दाखवणारे फोन आल्याची धक्कादायक माहिती 'साम टीव्ही'च्या हाती लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com