ब्रेकिंग ! एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला; प्रसाद चौगुले राज्यात प्रथम 

mpsc-r_201902192561.jpg
mpsc-r_201902192561.jpg

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण 17 संवर्गातील 431 पदांसाठी 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गात प्रसाद बसवेश्‍वर चौगुले यांनी 588 गूण घेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर पोलिस उपअधिक्षक परीक्षेत चैतन्य वसंतराव कदम यांनी प्रथम यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. 



17 संवर्गातील 431 पदांसाठी होती भरती 
उपजिल्हाधिकारी (40), पोलिस उपअधिक्षक तथा सहायक पोलिस आयुक्‍त (31), सहायक राज्यकर आयुक्‍त (12), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (21), सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (16), उद्योग उपसंचालक (6), तहसिलदार (77), उपशिक्षणाधिकारी (25), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (3), कक्ष अधिकारी (16), सहायक गट विकास अधिकारी (11), उपअधिक्षक भूमी अभिलेख (7), राज्य उत्पादन शुल्क उपअधिक्षक (10), सहायक आयुक्‍त राज्य उत्पादन शुल्क (1), उद्योग अधिकारी (26), सहायक प्रकल्प अधिकारी (5), नायब तहसिलदार (113) अशा एकूण 431 पदांसाठी मागील वर्षी परीक्षा झाली होती. मात्र, निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. अनेक विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींना निवेदने दिली होती. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निकाल नुकताच जाहीर केला आहे. 

यांनी मिळविला प्रथम क्रमांक 
सहायक राज्यकर आयुक्‍त परीक्षेत गौरव मंगीलाल भालाघाटिया यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात अभिषेक दिपक कासोडे यांनी तर सहायक संचालक, वित्त व लेखा विभाग यामध्ये ज्ञानराज गणपतराव पौळ यांनी यश मिळविले. तसेच उद्योग उपसंचालक संवर्गात आकाश राजाराम दहाडे यांनी तर तहसिलदार संवर्गात ज्ञानेश्‍वर माणिकराव काकडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर उपशिक्षणाधिकारी संवर्गात राम शहाजीराव फरतंडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संवर्गात विकास भारतराव बिरादार, कक्ष अधिकारी संवर्गात मुकूंदराव विटेकर मुकूल यांनी यश मिळविले. तसेच सहायक गट विकास अधिकारी अक्षय रमेश भगत, उपअधिक्षक भूमी अभिलेख संवर्गात शिवराज उमेश जाधव, राज्य उत्पादन शुल्क उपअधिक्षक अश्‍विनकुमार श्रीमंत माने, सहायक आयुक्‍त राज्य उत्पादन शुल्क संवर्गात श्रीकांत पांडूरंग कोकोटे, उद्योग अधिकारी संवर्गात भालचंद्र तात्यासाहेब यादव, सहायक प्रकल्प अधिकारी संवर्गात विजय साहेबराव साळुंखे, नायब तहसिलदार संवर्गात अभिजित कैलाससिंग हजारे यांनी यश मिळविले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com