

The Maharashtra government has proposed postponing the MPSC Online Exam implementation until August 2027, with the final decision pending before the commission.
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा संगणक आधारित (ऑनलाइन) पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला राज्यभरातून होत असलेला वाढता विरोध पाहता, राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. एमपीएससीच्या परीक्षा लगेच ऑनलाइन न घेता, ऑगस्ट २०२७ पासून या प्रणालीची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एमपीएससी’ला दिले आहेत. मात्र, विद्यार्थी संघटनांनी या भूमिकेवरही आक्षेप घेत ऑनलाइन परीक्षांना कोणत्याही परिस्थितीत विरोध कायम राहील, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.