MPSCच्या उमेदवारांसाठी विशेष सूचना; पूर्व परीक्षेसाठी नवे प्रवेशपत्र करा डाऊनलोड!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 March 2021

राज्य सरकारने एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना खुल्या किंवा इडब्लूएस प्रवर्गातून अर्ज भरण्याचा संधी देऊन नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२०’ परीक्षेसाठी नवे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उमेदवारांनी हे प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे, जुन्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

‘राज्य सेवा पूर्व परीक्षा’, ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा’ आणि ‘अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा’ कोरोना आणि आरक्षणाच्या समस्येमुळे ढकलण्यात आली होती. राज्य सरकारने एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना खुल्या किंवा इडब्लूएस प्रवर्गातून अर्ज भरण्याचा संधी देऊन नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार १४ मार्च रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा राज्यभर होणार आहे. या परीक्षेसाठी आयोगाने विशेष सूचना उमेदवारांसाठी दिलेल्या आहेत.

बुमराह महाराष्ट्राचा जावई होणार की साउथचा? सोशल मीडियात चर्चांना उधाण​

याकडे लक्ष द्या
- नवे प्रवेशपत्र डाऊनलोड करून, त्याची प्रिंट काढलेले मूळ स्वरुपातील प्रवेशपत्र सोबत आणावे.
- नव्या प्रवेशपत्राशिवाय परीक्षेसाठी प्रवेश मिळणार नाही.
- आधारकार्ड, लायसन्स, मतदान कार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड यापैकी एक ओळपत्रप म्हणून सोबत आणावे, त्यासोबत त्याची छायांकित प्रत सोबत आणणेही अनिवार्य आहे. केवळ छायांकित पत्र सोबत आणल्यास परीक्षा देता येणार नाही.
- परीक्षा केंद्रावर दीड तास आधी आणि परीक्षा कक्षातील बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी किमान एक तास आधी उपस्थित राहावे.

रुबाब खाकीचा, विषय नाही बाकीचा! PSI पल्लवी जाधव ठरल्या 'मिस इंडिया' फर्स्ट रनर अप!​

- परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी दिलेल्या वेळेनंतर आल्यास प्रवेश दिला जाणार नाही.
- प्रवेशपत्र, ओळखपत्र, ओळखपत्राची छायांकित प्रत, पेन, मास्क, सॅनिटाझर सोबत घेऊन परीक्षा कक्षात जाता येईल.
- कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून, सोशल डिस्टन्सींचे पालन करावे.
- प्रवेशपत्र मिळविण्यास अडचणी आल्यास ०२२-६१३१६४०२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

- MPSC पूर्व परीक्षेचं प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MPSC State Service 2021 Prelims Admit Card Released Check Steps To Download