MPSCचा मोठा निर्णय; युपीएससीच्या धर्तीवर होणार पूर्व परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

MPSCचा मोठा निर्णय; युपीएससीच्या धर्तीवर होणार पूर्व परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवेच्या पुर्वपरीक्षेत घेतल्या जाणाऱ्या सी-सॅट या पेपरला फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसीनंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमधील सामान्य पेपर क्रमांक २ (सी-सॅट) याच्या पात्रतेसाठी किमान ३३ टक्के गुणांची अट ठेवण्यात आली आहे. या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पेपर क्रमांक १ मधील गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर एमपीएससी ‘सी-सॅट’ पेपर सुरू केला. मात्र, यूपीएससीच्या परीक्षेत सी-सॅट केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरला जातो तर एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य होते. त्यामुळे याविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलने झाली, त्यानंतर आयोगाने समिती नेमून हा निर्णय घेतला

आयोगाकडबन ट्विट करत राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ पासून प्रस्तूत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन (CSAT) हा केवळ पात्रतेसाठी (किमान ३३ टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला असल्याची माहिती दिली. या निर्णया व्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही असे देखील आयोगाने सांगितले आहे. ३३ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची पेपर क्रमांक एक मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.

दरम्यान आयोगाच्या या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत केलं जात आहे, विद्यार्थ्यांकडून UPSCच्या धर्तीवर जवळ जवळ ५ वर्षांनंतर आयोगाने हा ऐतिहासिक निर्णय घेऊन खऱ्या अर्थानं इंजीनीअरींग आणि मेडीकलची पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्या बद्दल आयोगाचे खुप आभार आता, सर्व समान अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: Mpsc State Service Main Examination Decision To Accept 33 Percent Marks For Eligibility

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MPSC Exam
go to top