गोविंदांना नोकरीत आरक्षणाचा शिंदे सरकारचा निर्णय; MPSCचे विद्यार्थी आक्रमक

Eknath SHinde
Eknath SHinde
Updated on

मुंबई : दहिहंडीचा आता क्रीडा प्रकारात समावेश करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तसेच या खेळात सहभागी खेळाडू अर्थात गोविंदांना शासकीय योजनांचा लाभही मिळणार आहे. यामध्ये गोविंदांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण असेल अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र त्यांच्या या घोषणेला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून कडाडून विरोध होत आहे. (Inclusion of Dahihandi in sports Govinda news in marathi)

एमपीएससीच्या समन्वय समिती महाराष्ट्र राज्यच्या ट्विटर हँडलवर या संदर्भातील ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, रविकांत वर्पे, आमदार रोहित पवार, काँग्रेस नेते सत्यजीत तांबे, भाजपनेते केशव उपाध्ये, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जितेंद्र आव्हाड, सीएमओ आणि रामराजे शिंदे यांना टॅग करण्यात आले आहे.

Eknath SHinde
जखमी गोविंदांवर होणार पालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार!

मुख्यमंत्र्यांनी याबाबत विधानसभेत निवेदन सादर केलं. ते म्हणाले, दहिहंडीवेळी जर एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाला तर त्याला शासनाकडून १० लाख रुपये मदत देण्यात येईल. तसेच जर एखादा गोविंदा जबर जखमी झाला तर त्याला साडेसात लाख रुपये, अपघातात अपंगत्व आलं तर पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.

दहिहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात करण्यात यावा अशी सर्वच गोविंदांची मागणी होती. म्हणून या गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करुन 'प्रो गोविंदा' स्पर्धा राबवाव्यात. तसेच या स्पर्धा राज्य शासनाकडून राबवण्यात येतील. या स्पर्धकांना बक्षिसाची रक्कम शासनाकडून मिळेल. त्याचबरोबर इतर खेळांप्रमाणं या गोविंदांदेखील शासकीय नोकऱ्यांमध्ये ५ टक्के कोट्याचा लाभ घेता येईल. तसेच इतर सुविधांचाही लाभ घेता येईल, असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com