esakal | सर्वच पदांची भरती 'एमपीएससी'तर्फे करा; उच्चस्तरीय बैठकीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC

राज्यात अराजपत्रीत गट ब, गट क पदांची भरती महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून सुरू केली होती. मात्र, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होऊन अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नाही.

सर्वच पदांची भरती 'एमपीएससी'तर्फे करा; उच्चस्तरीय बैठकीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : केरळच्या सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सर्वच पदांची 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगा'तर्फे भरती करावी, यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय बैठक घेऊन त्याबाबत निर्णय करावा, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट्स राईट्स संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

अमोल कोल्हे यांचे स्वप्न होणार पूर्ण...या प्रकल्पाला हिरवा कंदील​

राज्यात अराजपत्रीत गट ब, गट क पदांची भरती महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून सुरू केली होती. मात्र, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होऊन अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नाही. बोगस गुणपत्रिका डमी उमेदवार यामुळे हा घोटाळा राज्यभर गाजला. त्यामुळे महापरीक्षा पोर्टल कायमचे बंद करावे, अशी मागणी केली जात होती.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात आले. मात्र, आता जिल्हास्तरा ऐवजी विभागीय स्तरावर भरती केली जाणार आहे. या ऑनलाईन पोर्टलसाठी सध्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, ही भरती थेट 'एमपीएससी'द्वारेच करावी, अशी मागणी केली जात आहे. 

व्हेंटिलेटर अभावी शास्त्रज्ञाचा करुण अंत; पुण्यात अपुऱ्या वैद्यकीय सुविधेचा आणखी एक बळी!​

दरम्यान, गट अ ते गट क या शासकीय पदांची भरती एमपीएससीने करण्याची तयारी दर्शविली आहे, त्यामुळे यासाठी त्वरीत बैठक घेऊन त्यास मान्यता द्यावी, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे प्रतिनिधी महेश बडे, किरण निंभोरे यांनी केली आहे. 

तत्पूर्वी, एमपीएससीचे सह सचिव सुनिल औताडे यांना याबाबत विचारले असता असा कोणताही प्रस्ताव आमच्या विचाराधीन नाही, असे स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)