'एमपीएससी'चा ऐतिहासिक निर्णय ! उत्तरपत्रिकांच्या कॅन इमेजेस विद्यार्थ्यांच्या प्रोफाइलवर मिळणार 

तात्या लांडगे
Wednesday, 7 October 2020

विद्यार्थीहिताचा देशातील पहिला मोठा निर्णय 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या कालनिर्णय ऑक्‍टोबर 2020 नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि चाळणी परीक्षांसाठी लागू असणार आहे. देशातील सर्वात मोठा विद्यार्थी हिताचा पहिला निर्णय महाराष्ट्र आयोगाने घेतला आहे. 

- सुनिल आवताडे, सहसचिव, एमपीएससी 

सोलापूर : राज्य आयोगाच्या उमेदवाराने परीक्षेवेळी उत्तरपत्रिकेवर आयोगाच्या सूचनेनुसार व उत्तरपत्रिकेच्या मलपृष्ठावर उत्तरे नोंदविणे गरजेचे आहे. उत्तरपत्रिकेच्या (भाग-2) कार्बन प्रतीवरून उमेदवाराने संबंधित परीक्षेमध्ये छायांकित केलेली उत्तरे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या उत्तरतालीकेवरून पडताळून पाहता येतात. त्यामुळे उमेदवारास प्राप्त होणाऱ्या गुणांचा अंदाज बांधता येतो. उमेदवारांना संबंधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेल्या गुणांची माहिती व्हावी व उमेदवारांना परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये, याकरिता आयागाने हा निर्णय घेतला आहे.

 

ठळक बाबी.... 

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांसाठी उत्तरपत्रिकांच्या इमेजेस उमेदवारांना प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील 
  • उत्तरपत्रिकांच्या स्कॅन इमेजेससोबत निकालाकरता गृहित धरलेले एकूण गुणही मिळतील 
  • उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गातील करिता च्या गुणांची किमान सीमांकन रेषाही यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलवर उपलब्ध होणार आहे 
  • 'एमपीएससी'च्या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची झाली सोय
  • ऑक्‍टोबर 2020 नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि चाळणी परीक्षांसाठी लागू असणार​

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे सर्व परीक्षण करता उमेदवारांना दोन भागांची उत्तर पत्रिका उपलब्ध करून दिली जाते त्यामध्ये भाग एक अंतर्गत मूळ प्रत ही परीक्षा नंतर आयोगाच्या कार्यालयाकडे जमा करण्यात येते तर भाग-2 अंतर्गत कार्बन परीक्षेनंतर उमेदवारांना सोबत घेऊन जाण्याची मुभा उमेदवारांना देण्यात आले आहे. आयोगाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

विद्यार्थीहिताचा देशातील पहिला मोठा निर्णय 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या कालनिर्णय ऑक्‍टोबर 2020 नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि चाळणी परीक्षांसाठी लागू असणार आहे. देशातील सर्वात मोठा विद्यार्थी हिताचा पहिला निर्णय महाराष्ट्र आयोगाने घेतला आहे. 

- सुनिल आवताडे, सहसचिव, एमपीएससी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MPSCs historic decision : Can images of answer sheets will be available on student profiles