न्यायालयांनाही महाराष्ट्रद्रोही ठरवणार काय?

मृणालिनी नानिवडेकर
Saturday, 28 November 2020

पदासाठी युती तोडण्याचा निर्णय घेऊन स्थापन झालेले सरकार खरे तर अनैसर्गिक. राज्यात महाभकास आघाडीची पायाभरणी करणारे हे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान होत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पदासाठी युती तोडण्याचा निर्णय घेऊन स्थापन झालेले सरकार खरे तर अनैसर्गिक. राज्यात महाभकास आघाडीची पायाभरणी करणारे हे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान होत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाविकास आघाडी सरकारचे वर्षपूर्तीनिमित्त मूल्यमापन काय करणार आणि हे सरकार काम करणारे नव्हे तर स्थगिती देणारे आहे, असा हल्ला त्यांनी केला. ते म्हणाले, मुळात या तीन पक्षांचे एकत्र येणे हेच अनैसर्गिक. तानाशाही हा या सरकारचा स्वभावधर्म झाला आहे. सत्ता डोक्यात गेली की चिरडून टाकूची भाषा सुरु होते. पहिल्याच वर्षात हे घडले. पत्रकार अर्णव गोस्वामी किंवा अभिनेत्री कंगना राणावत यांची सर्वच मते आपल्याला पटत नाहीत. आपण त्यांचे समर्थकही नाहीत, पण त्यांच्यावर जी कारवाई केली गेली, ती आकसपूर्ण होती. आज न्यायालयाने तसे ताशेरे ओढले आहेत. आता या न्यायालयांनाही महाराष्ट्रद्रोही ठरवणार काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

ठाकरे सरकारचा कारभार उत्तम; 40 टक्के जनतेचं मत

राज्यात कोविडची हाताळणी कशी होती ?
हा विषय राजकारणाचा नाही. केंद्राने महाराष्ट्राला सर्वतोपरीने मदत केली. ती एकत्र जबाबदारी आहे. पण राज्याने केंद्राला दूषणे देण्याशिवाय काहीही केले नाही. खाटा नाहीत ,औषधांचा काळाबाजार अशा नको त्या गोष्टी राज्यात घडल्या. महाराष्ट्र देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य.पण ते कोविडरुग्णात अग्रक्रमावर राहिले .दु:खद आहे हे.

जीएसटीचा निधी दिला नाही केंद्राने ? 
हाही अपप्रचार आहे. सूत्र निश्चित झाले आहे. केंद्राकडून राज्याला सर्वतोपरीने मदत केली जात आहे.

5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना डिसेंबरपासून भरता येणार ऑनलाइन प्रवेश अर्ज

यंत्रणांचा वापर केला जातोय राज्याविरोधात? 
राज्यातील सरकारला कोणत्याही संदर्भात हा महाराष्ट्रद्रोह आहे म्हणायची सवय लागली आहे. कोणतीही यंत्रणा तक्रारींची दखल घेऊन कारवाई करत असतात. शिवाय कर नाही त्याला डर कशाला? महाविकास आघाडी सरकारने स्थगिती देणे, बदल्या करणे या शिवाय कोणतेही काम केलेले नाही. दुर्दैव आहे

राज्याचे प्रश्न हाताळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने काय केले ?
काहीच केले नाही. दररोज नको त्या प्रश्नांवर चर्चा सुरु करायची, केंद्रावर आरोप करायचे हेच या सरकारने सुरु ठेवले आहे. महिलांवरील अत्याचार वाढताहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने घेतलेली भूमिका त्या वर्गाच्या आकांक्षांवर पाणी  फेरणारी आहे. भटके विमुक्त, ओबीसींवरील अत्याचार वाढत आहेत. महाराष्ट्राच्या नुकसानीची पायाभरणी महाभकास आघाडीने केली आहे

या सरकारने घेतलेले काही निर्णय...
(मध्येच तोडत ) शेतकऱ्यांना वरदान ठरलेली जमीन ओलीताखाली आणणारी जलयुक्त शिवार योजना रद्द करणे, शेतकरी हितावर वरवंटा फिरवणे, मेट्रोच्या कामाला स्थगिती देणे, शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या रद्द करणे, जनविरोधी धोरणे आहेत ही. कारण काय तर ते आम्ही घेतलेले निर्णय होते म्हणून. महाराष्ट्राला मागे नेणारी ही आघाडी आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mrunalini naniwadekar discussion with devendra fadnavis comment