गुड न्यूज! ‘या’ विभागात राज्यातील सात हजार जणांना आठ दिवसात मिळणार नोकरी

अशोक मुरुमकर
Wednesday, 24 June 2020

जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत. याचा थेट फटका अनेकजणांच्या नोकऱ्यांवर झाला आहे. काही ठिकाणी कंपन्या बंद पडत आहेत. तर काही ठिकाणी कामगार कपात केली जात आहे. सरकारने नवीन नोकरभरती होणार नसल्याचे जाहीर केले आहे.

सोलापूर : जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक उद्योग धंदे बंद पडले आहेत. याचा थेट फटका अनेकजणांच्या नोकऱ्यांवर झाला आहे. काही ठिकाणी कंपन्या बंद पडत आहेत. तर काही ठिकाणी कामगार कपात केली जात आहे. सरकारने नवीन नोकरभरती होणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अनेक तरुणांच्या मना भिती निर्माण झाला आहे. खासगी क्षेत्रातीलही काहींची नोकरी कधी जाईल हे सांगता येत नाही, अशा स्थिती महावितरणमध्ये आठवठ्यात ७००० जाणांना नोकरी मिळणार आहे. महावितरणमध्ये गेल्यावर्षी जाहीरात निघाली होती, त्यानूसार सुमारे दीड लाख उमेदवारांने अर्ज केले होते.

गेल्यावर्षी महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदाच्या भरतीसाठी जाहीरात निघाली होती. अनेकांनी यासाठी अर्ज केले. मात्र, पुढे त्याची प्रक्रिया झाली नव्हती. प्रलंबीत असलेली ही भरती आता आठ दिवसात पूर्ण करण्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आदेश दिले आहेत. उपकेंद्र सहाय्यकपदासाठी आयबीपीएस या संस्थेकडून परीक्षा घेण्यात आली होती. तर विद्युत सहाय्यक पदावर फक्त दहावीच्या गुणानुक्रमानुसार निवड केली जाते.

 

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महावितरण कंपनीमध्ये जुलै 2019 मध्ये उपकेंद्र सहाय्यक पदाच्या दोन हजार आणि विद्युत सहाय्यक पदाच्या पाच हजार पदांच्या सरळसेवा भरतीसाठी प्रक्रिया सुरु केली होती. यामध्ये 25 ऑगस्ट 2019 रोजी उपकेंद्र सहाय्यक पदासाठी आयबीपीएस या संस्थेकडून परीक्षा घेण्यात आली आहे. तर विद्युत सहाय्यक पदासाठी परीक्षा न घेता केवळ दहावीच्या गुणानुक्रमानुसार निवड करण्यात येते. त्यानंतर या दोन्ही पदाच्या सात हजार जागांच्या सरळसेवा भरतीची प्रक्रिया प्रलंबित आहे. राज्यातील सुमारे दीड लाख आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी या सात हजार जागांसाठी अर्ज भरलेले आहेत, ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे व इतर वरिष्ठ संचालकांशी चर्चा केली. त्यानंतर आठवड्याभरात विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत, याबाबतचे वृत्त सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनायाच्या महासंवादवर प्रसिद्ध झाले आहे.

याबाबत सत्यजित तांबे यांनी ट्विटद्वारे म्हटलंयं की, ‘सध्या कोरोनाच्या संकटामुळे अर्थ विभागाने नविन नोकर भरतीची प्रक्रिया न करण्याचे निर्देश दिले व युवकांमध्ये एक घबराट पसरली, मात्र ह्याही परीस्थितीत ज्याठिकाणी शक्य आहे, अशा ठिकाणी भरती करत राहील्यास बेरोजगार युवकांना थोडा तरी आधार मिळत राहील.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL will recruit for 7000 posts a week this information of Nitin Raut