Mukesh Ambani: मुकेश अंबानी बनले आजोबा; मुलगी ईशाने जुळ्या मुलांना जन्म दिला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukesh Ambani

Mukesh Ambani: मुकेश अंबानी बनले आजोबा; मुलगी ईशाने जुळ्या मुलांना जन्म दिला

उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा बनले आहेत. त्यांची मुलगी ईशा अंबानीने 19 नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे नावंदेखील जाहीर करण्यात आली आहेत.(Mukesh Ambani's daughter Isha gives birth to twins )

ईशाचे लग्न उद्योगपती अजय आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी झाले आहे. ईशाने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईशा आणि तिची दोन्ही मुले निरोगी आहेत. मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा आहे.

ईशा आणि आनंद 12 डिसेंबर 2018 रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. ईशा ही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी वडिलांना रिलायन्सचा व्यवसाय हाताळण्यास मदत करण्यास सुरुवात केली.

ऑक्टोबर 2014 मध्ये त्यांना रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओच्या बोर्डावर स्थान देण्यात आले. 2020 मध्येच मुकेश अंबानी आजोबा झाले, जेव्हा आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहता हिने 10 डिसेंबरला मुलाला जन्म दिला. आता मुकेश अंबानी पुन्हा आजोबा झाले आहेत.

टॅग्स :mukesh ambani