
महाराष्ट्राच्या सह्याद्री डोंगररांगांमध्ये असलेला पुरंदर किल्ला हे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ‘नयन फाउंडेशन’ आणि ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या माध्यमातून ४८ दृष्टिहीन साहसवीरांनी हा ऐतिहासिक किल्ला सर केला. या मोहिमेने आत्मविश्वासाचा संदेश दिला आणि सर्वत्र कौतुकाचा वर्षाव झाला.