
अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये? न्यायालयाने राणांना फटकारले
मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) राणा दाम्पत्यांना (Navneet Rana Ravi Rana) सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यांना माध्यमांसोबत बोलण्यास बंदी घातली होती. पण, त्यांनी माध्यमांसोबत बोलून अटींचं उल्लंघन केलंय, असा आरोप मुंबई पोलिसांनी कोर्टात केला होता. आता न्यायालयानं त्यांना नोटीस बजावली आहे.
हेही वाचा: नवनीत राणा दिल्लीकडे रवाना, भाजपच्या नेत्यांसोबत फिल्डिंग?
राणा दाम्पत्यांनी त्यांच्या वक्तव्याने जामीन अटींचे उल्लंघन केले असून जामीन आदेशानुसार त्यांचा जामीन रद्द करण्यात आला आहे. या जोडप्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, असे पोलिसांनी म्हटले आहे. असाच युक्तीवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला आहे. त्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी जामीनाच्या अटींचे उल्लंघन केले असून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये याविषयी त्यांना विचारणा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्यावरून राणा दाम्पत्य मुंबईत पोहोचले होते. पण, शिसैनिकांनी त्यांना त्यांच्या खार येथील घरीच रोखून धरले. त्यानंतर राणा दाम्पत्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अखेर १२ दिवसानंतर राणा दाम्पत्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यांना याप्रकरणी माध्यमांसोबत बोलण्यास बंदी घालण्यात आली होती. नाहीतर त्यांचा जामीन रद्द केला जाईल, असं न्यायालयानं म्हटलं होतं. पण, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पुन्हा तसेच वक्तव्य केले. माध्यमांसोबत बोलून जामीनाच्या अटींचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द झाला असून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करा, असा युक्तीवाद सरकारी वकील घरत यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्यांना नोटीस पाठवली आहे. आता राणा दाम्पत्यांना अटक होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
Web Title: Mumbai Court Issue Notice To Navneet Ravi Rana Violation Of Court Rules In Hanuman Chalisa Row
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..