Navneet Rana : नवनीत राणा यांना अटक होणार? अजामीनपात्र वॉरंट जारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai court orders immediate execution of non-bailable warrants against Navneet Rana

Navneet Rana : नवनीत राणा यांना अटक होणार? अजामीनपात्र वॉरंट जारी

खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बोगस जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवडी कोर्टाने बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आला आहे.(Mumbai court orders immediate execution of non-bailable warrants against Navneet Rana)

बोगस जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिवडी कोर्टात यावर सुनावणी सुरू होती. या सुनावणीवर शिवडी कोर्टाने बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आला आहे. याचबरोबर मुंलूंड पोलिसांनाही कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. शिवडी कोर्टाने याबाबचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्यावर काय कारवाई होणार का? यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

शिवडी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार 7 नोव्हेंबर रोजी याप्रकरणाची पुढील कारवाई होणार आहे. तोपर्यंत नवनीत राणा यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

नवनीत राणा यांच्या विरोधात बोगस जात प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर मागच्या महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. यावर शिवडी कोर्टाने निर्णय दिल्याने राणा यांच्यावर कारवाई होणार का? अशी चर्चा रंगली आहे. शिवडी कोर्टाने आदेश देताच खासदार राणा यांनी बोगस जात प्रमाणपत्राप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागितली आहे.

टॅग्स :navneet rana