Mumbai Dam Water Storage : मुंबईकरांनो लक्ष द्या , तुळशी पाठोपाठ तानसा आणि विहार तलावही झाला ओव्हर फ्लो

२१ फेब्रुवारी पर्यंत पुरेल इतका जलसाठा उपलब्ध
तानसा आणि विहार तलाव
तानसा आणि विहार तलावsakal
Updated on

Mumbai dam water storage : तुळशी तलावापाठोपाठ आज तानसा आणि विहार हे दोन तलाव भरून वाहू लागले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत सध्या ८ लाख ५२ हजार ९५७ दशलक्ष लिटर इतका ५८.९३ टक्के जलसाठा जमा झालेला आहे. हा जलसाठा पुढील २२१ दिवस म्हणजे २१ फेब्रुवारी पर्यंत पुरेल इतका असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली आहे.

तानसा आणि विहार तलाव
Pisuri Deer : माणगाव पेठेत भर वस्तीत आढळले अतिशय दुर्मिळ पिसोरी हरीण

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळेच सात तलावांपैकी एक तुळशी तलाव २० जुलै रोजी रात्री १.२५ वाजता वाहू लागला. तर, विहार तलाव बुधवारी मध्यरात्री १२: ४८ वाजता तर तानसा तलाव पहाटे ४:३५ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. सातपैकी तीन तलाव अवघ्या सात दिवसांत भरून वाहू लागले आहेत. मुंबईकरांसाठी ही दिसालादायक बाब आहे. मुंबईत अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात लागू आहे.

तानसा आणि विहार तलाव
Jalgaon Crime News : 2 चोरट्यांना नागरिकांकडून चोप; संशयितांना केले पोलिसांच्या स्वाधीन

सद्या सात तलावांत सध्या ८ लाख ५२ हजार ९५७ दशलक्ष लिटर (५८.९३ टक्के) पाणीसाठा जमा झालेला आहे. हा पाणीसाठा पुढील २२१ दिवस म्हणजे २१ फेब्रुवारी पर्यंत पुरेल इतका आहे. त्यातही सात पैकी तुळशी, विहार हे कमी पाणी साठवण क्षमतेचे तलाव भरले असून तानसा तलावही भरल्याने तलावात सध्या ५८.९३ टक्के इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. सात तलावांमधील एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याच्या जवळजवळ ५० टक्के पाणीसाठा हा भातसा तलावांत असतो. मात्र हा तलाव सध्या ५० टक्के इतका भरलेला आहे. तर मोडक सागर तलाव ८७.६९ टक्के, मध्य वैतरणा तलाव ६७.९४ टक्के, अप्पर वैतरणा तलाव ३१.४१ टक्के भरले आहेत.

तानसा आणि विहार तलाव
Ghee For Face : काळवंडलेल्या चेहऱ्यासाठी क्रिम,पार्लर ट्रिटमेंट करून झालं असेल तर एकदा देशी तूप लावा, फरक पडतो!

२६ जुलै रोजी सात तलावातील पाणीसाठा

----------------------------------------------------------

तलाव पाणी पुरवठा आजची

क्षमता पातळी

दशलक्ष लि.

------------ ------------ ----------------------------

अप्पर वैतरणा २,२७,०४७ ७१,३२९

मोडकसागर १,२८,९२५ १,१३,०५६

तानसा १,४५,०८० १,४५,०८०

मध्य वैतरणा १,९३,५३० १,३१,५०३

भातसा ७,१७,०३७ ३,५६,३७८

विहार २७,६९८ २७,६९८

तुळशी ८०४६ ८०४६

----------------------------------------------------------

एकूण १४,४७,३६३ ८,५२,९५७

पाणीसाठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.