esakal | Mumbai: विकासकामांसाठी मिळणार चार कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

fund

मुंबई : विकासकामांसाठी मिळणार चार कोटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना भविष्यात यात आणखी वाढ करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिला होता. त्याचे पालन करीत या निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ केली. त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी चार कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.

अजित पवार यांच्या या निर्णयाने सत्ताधाऱ्यांसह विरोधी आमदारांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खासदारांचा विकास निधी गोठविला आहे. त्यामुळे स्थानिक विकास कामांसाठी खासदारांकडे कोणताही निधी उपलब्ध नाही. राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक कोटीची वाढ करून तो तीन कोटी करण्याची घोषणा सभागृहात केली होती. भविष्यात या निधीत आणखी वाढ करण्याचा शब्दही दिला होता. हा शब्द पाळताना त्यांनी आमदारांचा विकास निधी चार कोटी रुपये केला आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ केल्यामुळे सामान्य जनतेच्या विकासाची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा: मी लोळत जाईन, नाही तर गडगडत : उदयनराजे

आतापर्यंतची सर्वांत मोठी वाढ

राज्याच्या इतिहासातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीतील वाढीची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी वाढ आहे. त्याचबरोबर आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून, प्रत्येकी एक कोटीचा निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास आमदारांना परवानगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

निधीचे वाटप(विधानसभेचे २८८ व विधान परिषदेतील ६६ आमदार)

३५०

आमदार

३५० कोटी रु

अतिरिक्त निधी

१,४०० कोटी रु

वार्षिक रक्कम

loading image
go to top