esakal | NCBने ज्या दोघांना सोडलं त्यात भाजप नेत्याचा मेहुणा; मलिकांचा मोठा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

sameer wankhede

NCBने ज्या दोघांना सोडलं त्यात भाजप नेत्याचा मेहुणा; मलिकांचा खुलासा

sakal_logo
By
विनायक होगाडे

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी त्यांने मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे केले होते. त्यांनी आता याच प्रकरणाबद्दल आणखी महत्त्वाचे खुलासे केले आहेत. त्यांनी आज ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या संख्येवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. क्रूझवरुन त्या रात्री आठ जणांना ताब्यात घेतलं की दहा जणांना? दोन जणांना सोडून देण्यात आल्याचा आणि त्यापैकी एक जण हा भाजपच्या एका हायप्रोफाईल नेत्याचा मेहूणा असल्याचा दावा त्यांनी केलाय.

नवाब मलिक यांनी आज म्हटलंय की, मुंबईत एनसीबीने कारवाई केल्यानंतर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट दिली होती. त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं की आम्ही आठ ते दहा जणांना ताब्यात घेतलंय. एक अधिकारी जो संपूर्ण कारवाई करतो आहे तो असं व्हेग स्टेटमेंट कसं करु शकतो? ताब्यात घेतलेल्यांची संख्या एक तर आठ असेल किंवा दहा असेल. जर दहा असतील तर दोन नंतर सोडले असतील. कोणत्या दोन जणांन सोडण्यात आलं आहे, त्याबाबत खुलासा करणारी पत्रकार परिषद मी उद्या दुपारी बारा वाजता घेईन. ज्या दोन लोकांना सोडलं आहे त्यांच्याबद्दल मी व्हिडीओ सकट पुरावे देणार आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, त्यात एक भाजपच्या नेत्याच्या मेहुणा आहे. भाजपच्या कोणत्या व्यक्तीच्या सांगण्यावरुन त्या दोघांना सोडण्यात आलंय, हा खरा प्रश्न उपस्थित होतो.

loading image
go to top