Pain Free Syringe : आता सुईशिवायही मिळणार 'इंजेक्शन'
Mumbai IIT Research : मुंबई आयआयटीच्या संशोधकांनी शॉकवेव्ह नावाची वेदनारहित सिरींज विकसित केली आहे. ही सुईशिवाय इंजेक्शन पद्धती आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवेल.
मुंबई : इंजेक्शन म्हटले की टोचल्याच्या वेदना होणार असे डोक्यात येते. आता मात्र मुंबई आयआयटीच्या संशोधकांनी यावर उपाय शोधला आहे. संशोधकांनी शॉकवेव्ह नावाची एक सिरींज विकसित केली असून ती वेदनारहित आहे.