
Pednekar-Somaiya Video : एकमेकांची डोकी फोडणाऱ्या कार्यकर्त्यांनो, हा व्हीडिओ बघाच!
मुंबईः किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे किरीट सोमय्या आणि सोमय्यांना जशास-तसं उत्तर देणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यातील वैर सबंध महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु आज एका लग्न समारंभात या नेत्यांमधलं सख्य समोर आलेलं आहे. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.
एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते किरीट सोमय्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर हे जेव्हा एकमेकांसमोर आले तेव्हा त्यांच्यात आपुलकीचा संवाद झाला.
मुहूर्त होता लग्न सोहळ्याचा... या लग्न सोहळ्यात किरीट सोमय्या आणि किशोरी पेडणेकर यांची समोरासमोर भेट झाली... किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमया यांनी तर किशोरी पेडणेकर यांना वाकून नमस्कार करत तब्येतीची विचारपूस केली... तर किशोरी पेडणेकरांनीही नील सोमय्यांचा उल्लेख 'नील बेटा' असा केला.
पेडणेकर-सोमय्यांमधला संवाद
किशोरी पेडणेकरः नमस्कार.. नील बेटा कसायस तू
नील सोमय्याः जय महाराष्ट्र
किरीट सोमय्याः हा नेहमी म्हणतो, मॅडम किती चांगलं बोलतात
किशोरी पेडणेकरः हे बघा आपलं राजकीय चालू असतं, त्याचं काय.
हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इकडे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर जाळ अन् धूर काढत असतात. कधी-कधी एकमेकांची डोकीही फोडली जातात. त्या कार्यकर्त्यांनी हा व्हीडिओ नक्की बघावा.