'आप'ची होणार महाराष्ट्रात "एंट्री'

संजय मिस्कीन
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

मुंबई - 'जनलोकपाल'चे आंदोलन महाराष्ट्रातून उभे राहिले व त्यातून आम आदमी पक्षाची स्थापना झाली. त्या महाराष्ट्रातच आम आदमी पक्षाची मात्र अद्याप मुहूर्तमेढ रोवली नसली तरी 12 जानेवारीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सिंदखेडराजा येथे जाहीर सभा होणार असून, राज्यात "आप'ची एन्ट्री होणार असल्याचे सूचित केले जात आहे.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे निमित्त साधत अरविंद केजरीवाल राज्यात आम आदमी पक्षाची भूमिका मांडती,÷िअसे मानले जात आहे. जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्याचदिवशी सिंदखेडराजा येथे जाहीर सभा असल्याने "मराठा कार्ड' आत्मसात करण्याचा आम आदमीचा प्रयत्न असू शकतो का, यावर चर्चा सुरू झाली आहे. कॉंग्रेसचे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी अरविंद केजरीवाल यांना सिंदखेडराजाला येण्याचे निमंत्रण दिले होते. ते निमंत्रण स्वीकारत त्यांनी जाहीर सभादेखील आयोजित केली आहे. यासाठी शंभराहून अधिक कार्यकर्ते सभेच्या तयारीसाठी झटत आहेत. आम आदमी पक्षात राज्यभरातून प्रवेश करू इच्छिणाऱ्यामध्ये नव्या चेहऱ्यांसोबत माजी अधिकारी यांचाही मोठा वर्ग असल्याचे सूत्रांचे मत आहे.

दिल्लीत एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर "आप' पंजाब व हरियानामधे जोरदार तयारी केली होती. पंजाबमध्ये त्यांना काही प्रमाणात यश आले. नागरी मानसिकतेचा पक्ष म्हणून आम आदमीची ओळख असली, तरी पंजाबात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर पक्षाने जोरदार रान पेटवले होते. त्यामुळे महाराष्ट्रातही शेतकरीवर्गाला लक्ष्य करूनच पक्षाची भविष्यातील वाटचाल राहू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

महाराष्ट्रात केजरीवाल...
. जिजाऊ जयंतीदिनीच होणार अधिकृत घोषणा
. शंभर जणांची टीम सभेच्या तयारीत
. अनेक माजी सनदी अधिकारीही संपर्कात

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai maharashtra aap entry in maharashtra