मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 31 मार्च 2018

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने अभिनेत्री श्रीदेवी यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडे श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात झालेल्या अंत्यसंस्काराबाबत आणि संबंधित माहिती विचारली होती.

श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. श्रीदेवी या "पद्मश्री' असल्याकारणाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात शासकीय इतमामाने कोणत्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावयाचे, याबाबतचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याची माहिती गलगली यांना शासनाने दिली. 22 जून 2012 ते 26 मार्च 2018 पर्यंत महाराष्ट्रात 40 व्यक्तींवर अशाप्रकारे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्याचे अनिल गलगली यांनी म्हटले आहे.

Web Title: mumbai maharashtra news sridevi Funeral chief minister order