Court Order: 'आयटम' शब्द वापराल तर महागात पडेल! एकाला दीड वर्षांची शिक्षा

Court Order
Court Orderesakal
Updated on

मुंबईः पोक्सो न्यायालयाने एका प्रकरणामध्ये तरुणाला दीड वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या तरुणाने एका अल्पवयीन मुलीला 'आयटम' म्हणून संबोधले होते. विशेष म्हणजे, जेव्हा एखाद्या मुलीला उद्देशून 'आयटम' म्हटले जाईल त्याला लैंगिक शोषण समजले जाईल, असं कोर्टाने म्हटलं आहे.

२०१५मध्ये हे प्रकरण घडले होते. एका २६ वर्षीय व्यावसायिकाने १६ वर्षीय मुलाचा छळ केला. पीडिता शाळेतून घरी परतत असतांना त्याने तिचे केस ओढले आणि 'क्या आयटम कहाँ जा रही हैं?' असं म्हटलं. ही बाब न्यायालयाने गंभीर मानत लैंगिक हेतूनं पाठलाग केल्याचं नमूद केलं आहे.

१४ जुलै २०१५ रोजी जेव्हा पीडितेसोबत हा प्रसंग घडला तेव्हा तिने तातडीने १०० क्रमांकावर फोन फिरवला. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपींनी तिला धक्काबुक्की करत तिथून पळ काढला. याप्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायाधीश अन्सारी म्हणाले की, अशा रोडरोमिओंना धडा शिकवणे आवश्यक आहे.

पोक्सो कोर्टाने या आरोपीला दोषी ठरवल्यानंतर त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे माफीची याचिका करण्यात आली होती. परंतु कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

pandharpur aashadhi wari
Police officer taking bribe near police station
pistol in crime
solapur city
Marathi News Esakal
www.esakal.com