माझ सौंदर्य माझा अधिकार; मॅचिंग मास्कवर पेडणेकरांच उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kishori Pednekar
माझ सौंदर्य माझा अधिकार; मॅचिंग मास्कवर पेडणेकरांच उत्तर

माझ सौंदर्य माझा अधिकार; मॅचिंग मास्कवर पेडणेकरांच उत्तर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज पत्रकार परिषद घेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत (Covid19 Third Wave) उद्भवणाऱ्या आव्हानांबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी सर्वांनी मास्क वापरल्यास त्रास कमी होईल असं सांगितलं. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना डिझायनर मास्क वापरासंबंधीत प्रश्न विचारला असता, त्यांनी माझा मास्क थ्री लेअर आहेच. मात्र महिला म्हणून मला मॅचिंग हवं असतं, महिला म्हणून सौंदर्य हा माझा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार यांनी डिझायनर मास्कचा (Mask) फायदा नसल्याचं म्हटलं होतं.

हेही वाचा: देशात १ लाख १७ हजार नवे रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ३ हजारांवर

किशोरी पेडणेकर यांनी आज मुंबईत महानगर पालिकेडून केल्या गेलेल्या तयारीबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांना पत्रकारांनी डिझायनर मास्कच्या वापराबद्दल प्रश्न विचारला. यावेळी पेडणेकर यांनी स्वत: डिझायनर मास्क लावलेला होता. मात्र आपला हा मास्क तीन लेअरचा असल्याचं त्या म्हणाल्या. तसंच महिला म्हणून काही सुप्त गुण असतात. मॅचिंग हवं असतं, त्यामुळे मी हा मास्क वापरत असल्याचं त्या म्हणाल्या. तर दुसरीकडे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेत मास्कच्या वापराबद्दल माहिती देताना डिझायनर मास्क फारसे फायद्याचं नसून, N - 95 मास्क वापरण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील कोरोनासाठी बेड्स वाढवणार असल्याची घोषणा केली. लक्षणं असलेले आणि सौम्य लक्षणं असलेल्या सर्वांना बेड्स पुरवण्याची सोय मनपा करणार आहे, असं त्यांनी सांगितलं ऑक्सिजनचे बेड्स जवळपास १९ हजार असणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. आयसीयू बेड्स सात हजार एकूण २२ हजार खाटांची सोय करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Ajit Pawar
loading image
go to top