CIDCO Lottery: या दिवाळीला 'सिडको'कडून ८ हजार घरांचं गिफ्ट; आजपासूनच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CIDCO Lottery

CIDCO Lottery: या दिवाळीला 'सिडको'कडून ८ हजार घरांचं गिफ्ट

Navi Mumbai: यंदाच्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत करणारी बातमी आहे. यावर्षी सिडकोने तब्बल ७ हजार ८९४ घरांची लॉटरी जाहीर केली आहे. त्यामुळे नवी मुंबईत हक्काच्या घरासाठी झटणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

नवी मुंबईतील बामणडोंगरी, खारकोपर या भागात सिडकोच्या घरांचा लॉटरीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या घरांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आजपासून नागरिक या घरांसाठी अर्ज करु शकतात. यापूर्वी सिडकोने गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सोडत जाहीर केली होती. यामध्ये सदनिका, व्यावसायिक गाळे आणि भूखंडांचा समावेश होता.

आता ऐन दिवाळीच्या सणामध्ये सिडकोने ७ हजार ८९४ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. नवी मुंबईमध्ये घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना ही मोठी पर्वणी समजली जातेय.

टॅग्स :cidcomhadaDiwali