Bulli Bai Case : इंजिनिअरींगचा २१ वर्षीय विद्यार्थी पोलिसांच्या सापळ्यात कसा अडकला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

One arrested in Bulli Bai Case

Bulli Bai : इंजिनिअरींगचा २१ वर्षीय विद्यार्थी पोलिसांच्या सापळ्यात कसा अडकला?

मुंबई : Bulli Bai अॅपचा (Bulli Bai Case) वापर करून मुस्लीम महिलांना टार्गेट केले जात होते. तसेच या महिलांच्या फोटोंचा लिलाव करण्यात येत होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बंगळुरूमधून इंजिनिअरींगच्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. त्याला सोमवारी रात्री मुंबईत आणण्यात आले. पण, हा विद्यार्थी मुंबई पोलिसांच्या सापळ्यात कसा अडकला? याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.

हेही वाचा: SulliDeals & BulliBai वरून मुस्लीम महिला टार्गेट, शिवसेना आक्रमक

मुस्लीम महिलांचे फोटो त्यांच्या संमतीशिवाय सोशल मीडिया हँडलवरून उचलून त्यांना ट्रोल केलं जातं. त्यानंतर Bulli Bai हा हॅशटॅग वापरून या फोटोंचा लिलाव करण्यात येत होता. यामध्ये पत्रकार महिला, विद्यार्थिनींचा देखील समावेश आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियका चुतर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार नोंदवली होती. महिलांचा पाठलाग, बदनामीची शिक्षा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या इतर कलमांखाली 1 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी अॅपच्या डेव्हलपर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले आणि थेट बंगळुरू गाठले. त्यांनी इंजिनिअरींगच्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला अटक केली. बुल्ली बाई अॅपवरून अपमानास्पद मजकूर शेअर करण्यासाठी त्याने त्याच्या ट्विटर हँडलचा वापर केला. आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे, असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.

कसा अडकला जाळ्यात? -

संबंधित विद्यार्थी फोटो अपलोड करण्यासाठी वापरत असलेल्या ट्विटर हँडलचा आयपी अॅड्रेस ट्रेस केला. त्यामाध्यमातून त्याचा शोध घेतला अशता तो बंगळुरूला असल्याचे समजले. त्याला अद्याप अटक केलेली नाही. तसेच विद्यार्थ्याचा अॅप तयार करण्यात सहभाग होता किंवा तो मोठ्या टोळाचा भाग आहे का? याबाबत त्याच्याकडे चौकशी सुरू आहे, असं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

बुल्ली बाई प्रकरणावरून राजकीय वर्तुळातून देखील मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. एमआयएमचे औवेसी आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. दिल्ली पोलिसांनी GitHub प्लॅटफॉर्मवरून 'बुल्ली बाई' मोबाइल अॅप्लिकेशनच्या डेव्हलपर्सची माहिती मागविली आणि ट्विटरवरून देखील आक्षेपार्ह मजकूर काढण्यास सांगितले. हे प्रकरण "गंभीर" असल्याचे सांगून, दिल्ली महिला आयोगाने शहर पोलिस प्रमुख राकेश अस्थाना यांना नोटीस बजावून 10 जानेवारी रोजी कारवाईचा अहवाल मागवला. दोषींना अटक करून मुस्लिम महिलांच्या हिताचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे त्यात म्हटले आहे.

Web Title: Mumbai Police Arrested 21 Year Engineering Student From Bengaluru In Bulli Bai Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :mumbai police cyber cell
go to top