
अटक टळताच रश्मी शुक्लांविरोधात आणखी एक गुन्हा ; अडचणीत वाढ
मुंबई : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत असून, मुंबई पोलिसांनी शुक्ला यांच्याविरोधात टेलिग्राफ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आजच शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court ) 25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतर मुंबई पोलिसांनी शुक्ला यांच्या विरोधात टेलिग्राफ कायद्यांतर्गत आणखी एक गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. (Mumbai Police Registered Case Against Rashmi Shukla Under Telegraph Act )
हेही वाचा: डोळ्यात टाकलं हार्पिक अन् झंडूबाम; लुटण्याचा नवीन फंडा
फोन टॅपिंग (Phone Tapping) प्रकरणात दाखल झालेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती केली आहे. त्यावर न्यायालयाने 25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पीएस येथे गुन्हा दाखल आहे. (Rashmi Shukla Phone Taping Probe)
हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण अशक्य, अहवालात नेमकं काय म्हटलं?
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह विविध राजकीय पक्षांमधील महत्वाच्या नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे अभिवेक्षण (फोन टॅपींग) केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा पुणे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं.
या प्रकरणात शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे मंत्र्यांची संभाषणं रेकॉर्ड केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही शुक्लांवर कारवाई होणार असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर अटक टाळण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळवलं आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चु कडू, आशिष देशमुख व संजय काकडे यांचे तब्बल साठ दिवस फोन टॅप केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा: Russia Ukraine War Live : रशियाने युक्रेनचा अणुऊर्जा प्रकल्प घेतला ताब्यात
पुण्याच्या माजी पुणे पोलीस आयुक्त आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात बेकायदेशीर फोन टॅपिंगचे गंभीर आरोपावरून पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत वरिष्ठ रश्मी शुक्ला यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना 25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिलाय.
शुक्ला या सध्या हैदराबाद येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. शुक्ला यांच्यावर असलेल्या फोन टॅपींग प्रकरणात तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली होती. या सिमीतीने चौकशी करुन राज्य सरकारला अहवाल दिला या अहवालानुसार राज्य सरकारने रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
Web Title: Mumbai Police Registered Case Against Rashmi Shukla Under Telegraph Act
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..