मुंबईकरांनो! आजपासून मास्क नसल्यास पोलिसांकडून दंड होणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांनो! आजपासून मास्क नसल्यास पोलिसांकडून दंड होणार नाही

मुंबईकरांनो! आजपासून मास्क नसल्यास पोलिसांकडून दंड होणार नाही

मुंबई: काल राज्य मंत्रिमंडळाने कोरोनाचे सर्व प्रकारचे निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. गुढीपाडव्यापासून हे निर्बंध हटवले जाणार असून आता मास्क परिधान करणं सुद्धा ऐच्छिक असणार आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी मास्क नसल्यास दंड केला जात होता. मात्र, आता आजपासून मास्क न घातल्याबद्दल मुंबई पोलीस दंड करणार नाहीत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविड 19 विरूद्ध खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना स्वेच्छेने मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. 2 एप्रिलपासून महाराष्ट्रात सर्व कोविड निर्बंध उठवले जातील. (Corona)

हेही वाचा: 'भारत-रशिया संबंधांमध्ये बदल व्हावेत, अशी इच्छा नाही, मात्र...'; अमेरिकेचं स्पष्टीकरण

संपूर्ण जगभरात कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव सन २०२० च्या सुरुवातीपासून सुरु झाला होता. मुंबईतही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्याकरिता वेळोवेळी विविध उपाययोजना केल्या आणि विविध निर्णय घेतले होते. तोंडावर मुखपट्टी अर्थात मास्क परिधान केल्याने कोरोना पासून स्वतःचा बचाव होतो तसेच प्रसार थांबतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निर्देश दिल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे महानगरपालिका प्रशासनाने बंधनकारक केले होते. (Corona)

हेही वाचा: परबांनंतर हसन मुश्रीफ भाजपच्या रडारवर; किरीट सोमय्या आज दंड थोपटून पुण्यात

मास्कचा वापर न केल्यास दंड म्हणून २०० रुपये नागरिकांकडून आकारण्यात येत होते. या निर्णयाचे जे नागरिक अनुपालन करणार नाहीत त्यांच्यावर मनपा कर्मचारी - अधिकारी, मुंबई पोलीस तसेच खासगी सुरक्षा रक्षक (क्लिन अप मार्शल ) संस्था यांच्यामार्फत २०० रुपये दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केला जात होता.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार आटोक्यात येत असल्याने कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेली बंधने शिथिल करण्यात येत आहेत. बृहन्मुंबई परिसरात नागरिकानी मास्क न वापरल्यास यापूर्वी केली जात असलेली २०० रुपयांची दंडात्मक कार्यवाही आता उद्या दिनांक १ एप्रिल २०२२ पासून बंद करण्यात येत आहे. (Corona)

मात्र, संपूर्ण जगात कोरोनाचा धोका अजूनही पूर्ण तः टळला नाही. आरोग्याची खबरदारी म्हणून नागरिकांनी कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने मास्क परिधान करावे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Mumbai Police Will Not Fine People For Not Wearing Mask From Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top