मुंबईत पावसाचा 'येलो अलर्ट'; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

पुढील पाच दिवसांसाठी मुंबईसह कोकणात 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
heavy rain
heavy rainsakal

मुंबई : मुंबईसह उपनगरात सध्या धुव्वाधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यामुळे पुढील पाच दिवसांसाठी हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणात 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची आपत्ती व्यवस्थापन बैठक बोलावली आहे.

(Mumbai Rain Updates)

मुंबई, कोकण आणि घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात असून मुंबईत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील एक तासापासून मुंबईतील काही भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. दोन दिवसानंतर पावसाने जोर धरल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील मध्य आणि दक्षिण भागात जोरदार पाऊस सूरू झाला असून अद्याप या भागात पावसामुळे कोणताही अडथळा निर्माण झाला नाही पण पुढच्या पाच दिवसांत पालघर, मुंबई, ठाणे, रायगड कोल्हापूरसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने IMDकडून मुंबईत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

heavy rain
फडणवीसांचा गेम अन् राजकारणातील आणखी एक घराणं फुटलं

दरम्यान इकडे मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक बोलावली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी उपस्थित असणार आहेत. या बैठकीत सर्व जिल्ह्यातील आपत्तीच्या परिस्थितीचा आढावा घेतला जणार आहे. या बैठकीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे.

काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि कामाचा सपाटा चालू झाला. काल शपथ घेतल्यानंतर लगेच काही वेळात त्यांनी पहिली कॅबिनेटची बैठक घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी राज्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं होतं. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा संकल्प सरकारने केला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याचबरोबर मुंबईत पावसामुळे अनेक वेळा अडथळे निर्माण होतात यासाठी आम्ही आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com