

Tenant Eviction
esakal
Mumbai: भाडेकरू आणि घरमालक यांच्यात नेहमीच विळ्या-भोपळ्याचे नाते असते. घर भाड्याने दिल्यानंतर कराराची मुदत संपली तरी भाडेकरू घराचा ताबा सोडत नसेल तर परिस्थिती आणखी बिकट होऊन जाते. अनेकदा वाद-विवाद आणि कायदेशीर लढाई असा हा प्रवास असतो. त्यामुळे घर भाड्याने देणे आणि करार संपल्यानंतर भाडेकरूकडून पुन्हा घराचा ताबा घेणे ही मोठी कसरत असते. मात्र मुंबई पोलिसांनी आता घरमालकांना दिलासा देणारे पाऊल उचलले आहे.