
विधानसभेत शुक्रवारी लावण्यात आलेल्या ३५ लक्षवेधींवरून भाजपचे आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत पुन्हा एकदा संतापले. माथाडी कामगार विधेयकावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले,‘‘ कामगार कायद्यात बदल करत असताना आपण कामगारांना संरक्षण देता, तसे आमदारांना देखील संरक्षण देणे आवश्यक आहे.