महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार; 17 मे ला अंतिम प्रभाग होणार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election

महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार; 17 मे ला अंतिम प्रभाग होणार जाहीर

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता राज्यातील रखडलेल्या १४ महापालिका निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं याबाबत संबंधित महापालिका आयुक्तांना आदेश दिले आहेत. त्यासाठी तीन टप्प्यात प्रभाग रचनांचं काम पूर्ण करण्यास सांगण्यात आलं आहे. (Municipal Corporation elections to be held soon the final ward will be announced by May 17)

निवडणूक आयोगाच्या आदेशात काय म्हटलंय?

निवडणूक आयोगानं राज्यातील १४ महापालिका आयुक्तांसाठी महत्वाचा आदेश काढला असून यामध्ये तीन टप्प्यात प्रभाग रचनांचं काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, ११ मे अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण करावं, त्यानंतर १२ मे पर्यंत प्रभाग रचनांचा अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवावा तसेच १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचनेची अंतिम यादी प्रसिद्ध करावी असं निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

कोणत्या महापालिकांना पाठवले आदेश

राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, सोलापूर, नाशिक , पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली या चौदा महापालिकांना पत्र लिहून प्रभाग रचना अंतिम करण्याचे आदेश दिले आहेत.

सुप्रीम कोर्टानं दिले होते आदेश

सुप्रीम कोर्टानं नुकताच यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिला की, दोन आठवड्यात रखडलेल्या महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करावा. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर आता राज्य निवडणूक आयोग अॅक्शन मोडमध्ये आला असून १७ मेला अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, राज्य शासनानं सुप्रीम कोर्टानं सांगितलेल्या ट्रिपल टेस्ट आणि इम्पिरिकल डेटा अद्याप सादर न केल्यानं या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत. याप्रकरणी येत्या १२ जून रोजी सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे.

Web Title: Municipal Corporation Elections To Be Held Soon The Final Ward Will Be Announced By May 17

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top