esakal | एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भत्ते, थकबाकी द्या; सरकारकडे मागणी | Mva Government
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus Employee

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भत्ते, थकबाकी द्या; सरकारकडे मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एसटी महामंडळातील (ST bus corporation) कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचे वेतन (employee salary) १० ऑक्टोबरपर्यंत, तर ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी (diwali) अदा करावे, तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एकरकमी दिवाळीपूर्वी देण्यासंदर्भात परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील (satej patil), एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (shekhar channe) यांच्याकडे राज्य एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली.

हेही वाचा: नाजूक वयात असलेल्या मुलीला गर्भवती राहण्याची सक्ती नाही : न्यायालय

मागील काही दिवसांत एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर आल्या. कमी पगार, त्यातील अनियमितता यामुळे आत्महत्या केल्याचे मयत कर्मचाऱ्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले असून ही बाब हृदयाला चटका लावणारी आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी अत्यंत कमी पगार असल्याचे, त्यातच अनेक विभागात लॉकडाऊन हजेरी न दिल्याने रोख वेतन तुटपुंजे असेल. दिवाळी या तुटपुंज्या पैशांवर साजरी करणे शक्य नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन, महागाई भत्ता, थकबाकी, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी, घरभाडे भत्त्याची थकबाकी देणे आवश्यक असल्याचे मुकेश तिगोटे यांनी सांगितले.

महामंडळाचे आश्वासन फोल

एकतर्फी वेतनवाढ लागू करताना १ एप्रिल, २०१६ पासून शासनाप्रमाणे महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के, घरभाडे भत्ता ८, १६, २४ टक्क्याने देण्याचे मान्य केले होते; परंतु अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या घोषणा आतापर्यंत फोल ठरल्याची टीका तिगोटे यांनी केली.

loading image
go to top