अजित पवार नाव नसते तर गुन्हा दाखल झाला नसता : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

ज्या बँकेत शरद पवारांचा काडीमात्र संबंध नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. मी तुम्हाला लिहून देतो, की यामध्ये अजित पवारांचे नाव नसते तर गुन्हाही दाखल झाला नसता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

मुंबई : ज्या बँकेत शरद पवारांचा काडीमात्र संबंध नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. मी तुम्हाला लिहून देतो, की यामध्ये अजित पवारांचे नाव नसते तर गुन्हाही दाखल झाला नसता, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. शरद पवार आणि अजित पवारांना लक्ष्य करून ही कारवाई करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच मुलांना शेती, व्यवसाय करण्याचा सल्लाही दिल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, की आम्हालाही भावना आहेत. यापुढे साहेब सांगतिल तसे वागणार आहे. आमच्या घरात कोणताही गृहकलह नाही. पवारसाहेबच आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. शिखऱ बँकेशी पवारांचा काहीही संबंध नाही. पण, तरीही त्यांचे नाव आल्याने उद्विग्न होऊन मी राजीनामा दिला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: my place in director board was the only reason for this case against Shard Pawar says Ajit Pawar