Covid-19 : शासकीय कार्यालयांमध्ये मास्क बंधनकारक; प्रशासनाकडून मोठा निर्णय

Covid-19
Covid-19esakal
Updated on

नागपूरः चीनमध्ये कोरोनाने कहर केल्याच्या बातम्या येत आहेत. चीनसह अमेरिका, जपान या देशांमध्येही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी चार दिवसांपूर्वी एक उच्चस्तरीय बैठकही घेतली होती.

आता नागपूरमध्ये शासकीय कार्यालयामध्ये मास्कसक्ती करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी घेतला आहे. कोरोनाच्या BF.7 या व्हेरिएंटची जगाला धास्ती बसलेली आहे. त्यातच गुजरात आणि इतर काही राज्यांमध्ये नव्या व्हेरिएंटचे संशयित रुग्ण आढळून आलेले आहेत.

हेही वाचा- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. काही आमदारांना सर्दी-खोकल्यांची लक्षणं आढळून आलेली होती. त्यामुळेच नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्कसक्ती केली आहे. शिवाय शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनाही मास्क बंधनकारक असणार आहे.

Covid-19
UAE Lottery : भारतीय ड्रायव्हरला यूएईमध्ये 33 कोटींची लॉटरी; वरिष्ठांनी दिला होता महत्त्वाचा सल्ला

हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आख्खं मंत्रिमंडळ, अधिकारी आणि आमदारांची उपस्थिती आहे. त्यामुळे यंत्रणा अलर्ट मोडवर असून कोरोनाबाबतचे सर्व नियम कटाक्षाने पाळले जात आहेत. यासह नागपूरमध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या केल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com