Nagpur crime: iPhoneचा हट्ट झाला नाही पूर्ण; तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nagpur crime: iPhoneचा हट्ट झाला नाही पूर्ण; तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

मोबाईलसाठी तरूणाई खुप वाहत गेली आहे. अशीच एक धक्कादायक बातमी नागपूर मधून समोर आली आहे. आई वडिलांकडून आयफोन देण्याचं आश्वासन देवून पण तो लवकर न मिळाल्यानं मुलीने टोकाचं पाऊल उचललं. तिला आयफोन न मिळाल्याने एका मुलीने आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तरीही आई वडिलांनी तिला आयफोन घेऊन देण्याचं आश्वासन दिलं होतं. आयफोन लवकर न घेतल्यानं आपल्याला आई वडिल तो घेऊ देणार नाहीत असं मुलीला वाटलं. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. ही तरूणी नागपूर मधील हिंगणा शहरात शिकत होती.

हेही वाचा: रयत शिक्षण संस्थेचं नाव बदला अन् पवार शिक्षण संस्था करा; उदयनराजेंचा टोला

त्या तरुणीने घरातील पख्याला गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या आई वडिलांचा जबाब नोंदवला आहे. त्यामध्ये समोर आलेल्या माहिती नुसार मुलगी सतत आयफोन घेण्यासाठी मागे लागली होती असंही पोलिसांनी सांगितलं आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही तरीही घरच्यांनी आयफोन देण्याच आश्वासन दिलं होत.

टॅग्स :Nagpurpolicecrime